Laxman Hake vs Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Laxman Hake Video | मनोज जरांगे भंपक माणूस, सरकार पुरस्कृत आंदोलन म्हणताच लक्ष्मण हाके संतापले

Satish Daud

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असून मी हाके यांच्याविषयी काहीही बोलणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा लक्ष्मण हाके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी आहे का? असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यांनी जालना येथे आमरण उपोषण सुरू केलं असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी हाके यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धारच हाके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हाके यांची मनधरणी करण्यासाठी अनेक राजकीय नेते जालन्यात जाऊन त्यांची भेट घेत आहेत.

यावरून मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असून सर्व काही ठरवून चाललं आहे. अचानक काही गोष्टी घडायला लागल्या की लक्षात येतं. अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात मोठा फरक आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलकांना भेटायला येणं ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, जरांगे यांच्या या टीकेला हाके यांनी प्रत्युत्तर दिलं. मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांच्या टीमने माझ्यासमोर चर्चा करायला यावं. मी मीडियासमोर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी कायद्याने उत्तर द्यावी, असं आव्हान देखील लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT