yuva sena leaders in latur saam tv
महाराष्ट्र

लातूरमध्येही खिंडार ! युवासेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांसह १०० कार्यकर्ते शिंदे गटात होणार सामील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Government) सत्तेच्या चावी हाती घेतल्या. मात्र, आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (bmc election) एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखण्यात सुरुवात केलीय.'मिशन मुंबई'सुरू करून शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. तर दुसरीकडे लातूरमध्येही युवासेनेला खिंडार पडणार असून युवासेनेचे तब्बल ४० पदाधिकाऱ्यांसह १०० कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेचे शिवसेनेचे १८ नगरेसेवक शिंदे गटात सामील झाले असल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता लातूरमध्येही युवा सेनेला खिंडार पडणार आहे. युवासेनेचे तब्बल ४० पदाधिकाऱ्यांसह १०० कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहेत. लातुरमध्ये शिवसेना- युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्धार केला.

लातूरचे युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश खापरे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, लातुर येथील विश्राम गृहात शिवसेना- युवासेनेची बैठक पार पडली. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी होती. मात्र, त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी युवा सेनेची सूत्रे हाती घेतली. सरदेसाई यांचे धीरज देशमुख यांच्याही स्नेहसंबंध असल्याने गटातटाचे राजकारण केले गेले.

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केला, तेव्हा आम्हाला दगडफेक करण्यासाठी सांगितलं जातं. आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थन किंवा अभिनंदनही केले नाही. तरीही आमच्यावर अन्याय करत दुसऱ्या पदाधिकाऱ्याला जिल्हाप्रमुखपदी नियु्क्त करण्यात आले. हा आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता आम्ही उठाव केला आहे. एकनाथ शिंदे गटात आम्ही सहभागी होणार आहोत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : वडाळ्यात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai News: मुंबई हादरली! बाथरूमध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह, सायन रुग्णालयालयात नेमकं काय घडलं?

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा; तुमच्यावर कधीही वाईट वेळ येणार नाही

SCROLL FOR NEXT