महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवार म्हणाले...

महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकांमध्ये टीकणार का, आगामी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv
Published On

नागपूर: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकांमध्ये टीकणार का, आगामी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली.

'आगामी निवडणुकीत (Election) शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढायला हव्या, काँग्रेससोबतची चर्चा करायला हवी, असं वक्तव्य आज शरद पवार यांनी नागपुरात केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar
संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदेंची घोषणा

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, माझेही मतं महाविकास आघाडीने एकत्र लढावी अशीच आहे, पण चर्चा करुन हा निर्णय घेणार आहे. राज्यात दोघेजण सरकार चालवत आहेत. अतिवृष्टी पूर असले प्रश्न असताना मंत्रिमंडळाचे अजुनही विस्तार केलेला नाही. सरकार आल्यानंतर नवीन काय केले असते तर मी अभिनंदन केले असते, पण जुन्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करणे एवढेच सुरू आहे.

Sharad Pawar
भाई मला समजत नाही...; विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर रोहित वैतागलाच

अनिल देशमुख यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, सुप्रिम कोर्टाने मांडलेले निरीक्षण म्हत्वाचे आहे. मर्यादीत काळेपेक्षा जास्त दिवस जामीन देता जेलमध्ये ठेवणे योग्य नाही. हे निरीक्षण आशादायक आहे, असंही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com