latur sakal maratha samaj opposes maratha reservation bill saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : मराठा आरक्षण विधेयकाची लातूरमध्ये छावा संघटनेकडून हाेळी, निलंगा-किल्लारी बसवर दगडफेक

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur News :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) प्रश्नावरून लातूरमध्ये आज (मंगळवार) छावा संघटनेने आक्रमक हाेत आंदाेलन केले. सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावी अशी मागणी छावा संघटनेने केली. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केल्याचेही आंदाेलकांनी म्हटले. यावेळी सरकारच्या आजच्या निर्णयाची आंदाेलकांनी हाेळी करीत सरकारचा निषेध नाेंदविला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विधिमंडळात एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एक मतानं मंजूर झालं आहे.

आजच्या निर्णयाला लातूरमध्ये छावा संघटनेने विरोध केला आहे. मराठा समाजाला आज देण्यात आलेल्या अध्यादेशाची देखील यावेळी आंदोलकांनी हाेळी केली. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदाेलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Maharashtra News)

बसवर अज्ञातांची दगडफेक

निलंगा-किल्लारी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समाेर आली. निलंगा एसटी डेपोची निलंगा-किल्लारी धावणाऱ्या बसवर दगडफेक झाली. या बसच्या समोरील काच फुटली आहे. यावेळी दगडफेक करणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्याची झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT