रस्ता दिल्या शिवाय मृतदेह उचलनार नाही, गावकऱ्यांचा पावित्रा दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

रस्ता दिल्या शिवाय मृतदेह उचलनार नाही, गावकऱ्यांचा पावित्रा

रस्ता नसल्याने अनेकदा नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर - गेल्या अनेक दिवसांपासून अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकदा नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाला वेळोवेळी अर्ज विनंत्या करून देखील दखल घेत नसल्याने प्रेत उचलनार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली अन प्रशासनाने रस्ता तयार करून देऊ असं आश्वासन दिल्याने अखेर हा वाद मिटला.

हे देखील पहा -

गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभुमीकडे जाण्यासाठी रस्ता आहे मात्र या रस्त्यावर अतिक्रमण झाले असून पावसाने रस्त्याच्या आजूबाजूला गवत व पाण्याने साचलेले खडे आहेत प्रेत घेऊन जाण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे चित्र अहमदपूर तालुक्यातील चिखली गावात आहे हा रस्ता कायम स्वरूपी खुला करून दयावा अशी अनेक वेळा निवेदनाद्वारे मागणी संबंधीत प्रशासनास करण्यात आली.

मात्र हा रस्ता दुरुस्त न झाल्यांने आज प्रेताच अंत्यविधी न करण्याचा पावित्रा बौध्द समाज बांधवानी घेतला होता त्यावर तहसिल कार्यलयाच्या प्रतिनिधीनी हा रस्ता आठ ते पंधरा दिवसात पुर्ण करून देऊ असे लेखी अश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. यात विस्तार अधिकारी पटेवाड, ताटेपामुलवार मंडळ अधिकारी, तलाठी गडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पो.कॉ महाके, ग्रामसेवक सुनिल कांबळे, सरपंच संभाजी गायकवाड व समाज बांधव उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT