A tragic case in Latur highlights the severe impact of social media threats and relationship conflicts on youth mental health. Saam Tv
महाराष्ट्र

आधी गर्लफ्रेंडसोबत खटके उडाले, नंतर इन्स्टाग्रामवरून धमक्या आल्या अन्... कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

Youth End Life Due To Social Media Threats In Latur: लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून मिळणाऱ्या धमक्या आणि मानसिक तणावामुळे २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Omkar Sonawane

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर: जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आली आहे. प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून येत असलेल्या धमक्या आणि मानसिक तणावाला कंटाळून एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तेजस घोडके असं या तरूणाचं नाव असून आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहित त्याने आत्महत्येचं कारण सांगितलं. रेणापूर तालुक्यातील मोरवड येथील हा तरुण आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यानंतर सोशल मीडियावरून धमक्या देणे, बदनामी करण्याची भीती दाखवणे आणि सतत मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्वतः तेजस याने सुसाईड नोटमध्ये लिहून केला होता. या सर्वाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण काय, सोशल मीडियावरील धमक्या कितपत गंभीर होत्या आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील वाद आणि मानसिक तणाव किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT