Parents queue up at a private school vendor counter in Latur amid allegations of inflated book and uniform prices. saam tv
महाराष्ट्र

लातूरमध्ये शिक्षणसम्राटांकडून पालकांची लूट, 'साम टीव्ही'चं ऑपरेशन शिक्षण माफिया

Private Schools’ Book Scam Exposed: राज्यातील खासगी शाळा आणि पुस्तक विक्रेत्या दुकानांनी मिळून पालकांची सुरु केली लूट थांबण्याचं नाव नाही...अशातच शिक्षण माफियांचा हा गोरखधंदा थेट लातूरपर्यंत पोहचलाय...साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये शिक्षण संस्थांच्या दुकानदारीचा कसा पर्दाफाश झालाय ? पाहूयात या स्टिंग ऑपरेशनमधून...

Suprim Maskar

पुणे, नागपूरनंतर शिक्षण माफियांचा लातूर पॅटर्न आता साम टिव्हीच्या हाती लागलाय... खर तर लातूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न'. पण याच पॅटर्नच्या नावाखाली आता पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचा नवा 'धंदा' सुरू झालाय. खासगी शाळा आता केवळ ज्ञानदानाची केंद्रं उरली नसून, ती शिक्षणाच्या बाजारीकरणाचा अड्डा बनलेत.... पुणे, नागपूरनंतर आता लातूरमध्येही शाळांनी पालकांना गंडा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तक आम्ही सांगितलेल्या दुकानातूनच घ्यायची, असा सुल्तानी फर्मान काढलयं...त्याबाबत पालकांनी साम टीव्हीला माहिती दिली आणि सुरू झालं साम टीव्हीचं इन्व्हेस्टीगेशन...

पालकांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आणि लुटीच्या ऑपरेशनचा भांडाफोड करण्यासाठी साम टीव्ही पोहोचल लातूरमधील खासगी शाळेत...पुण्याप्रमाणेच शाळेच्या आवारातच एका खासगी विक्रेत्याची शाळेनं नेमणूक करुन पालकांची लूट सुरु केलीय... साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शिक्षण माफीयांचा बाजार कॅमेऱ्यात कैद झालाय..

CBSC बोर्डाच्या Health, Hygiene and Safety या पुस्तकाची बाहेरील विक्रेत्याकडे 450 रुपये किंमत असून हेच पुस्तक शाळेतील विक्रेत्याकडे 600 रुपयाला मिळतेय.. बाहेर 160 ते 210 रुपयाला मिळणारं मराठीचं पुस्तक शाळेतील विक्रेता थेट 250 रुपयाला विकतोय..इंग्रजीचे पुस्तक बाहेरील विक्रेत्याकडे 240 ते 270 रुपयांना मिळतं तिथेच शाळेतील विक्रेत्याकडे या पुस्तकासाठी 380 ते 420 द्यावे लागतात.. इतकचं काय तर 1 डझन वह्या बाहेरील विक्रेते 324 ते 390 रुपयाला विकत असून शाळेतील विक्रेता थेट 600 रुपये डझनला वही विकत असल्याचं समोर आलयं... तेच युनिफॉर्म किट बाबतही.बाहेर 3500 ते 4000 रुपयाला हे किट मिळतं तेच शाळेतील विक्रेता तब्बल 6500 हजार रुपयांना विकतो...

सामच्या प्रतिनिधीनं शाळेतील दुकानात पुस्तक खरेदी करण्यासाठी येणाऱ्या पालकांसोबतही जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा तर तिसरीची पुस्तक तब्बल 6131 रुपयांना दिली जात असल्याचं उघड झालं...खरं तर राज्याच्या शिक्षण खात्यात दररोज नवनवे घोटाळे समोर येत आहेत.. कधी शालार्थ आयडीचा घोटाळा करुन शिक्षक भरतीचा घोटाळा केला जातोय.. तर कधी बोगस शाळा आढळून येताहेत... त्यात आता लातूरमधील शिक्षण संस्थांनी नफेखोरीचा चष्मा चढवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलयं...

साम टिव्ही राज्यातील खासगी शाळांमधून सुरू असलेली पालकांची लूट सातत्यानं सामोर आणत आहे. शिक्षण मंत्र्यांनी यावर कारवाईचे आदेश दिलेले असले तरी ही लूट काही थांबताना दिसत नाही...एकूणच हे शिक्षण माफीया आता एवढे निर्ढावलेले आहेत की त्यांनी मंत्र्याच्या कारवाईलाही धुडकावून लावलंय..त्यामुळे शिक्षण माफियांच्या या मस्तवालपणाला चाप लावण्य़ासाठी सरकार काही अधिक ठोस कारवाई करणार की निव्वळ आदेश देऊन थंड बसणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT