गावठी कट्ट्यासह आरोपी अटक; लातूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
गावठी कट्ट्यासह आरोपी अटक; लातूर ग्रामीण पोलिसांची कारवाई  दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

गावठी कट्ट्यासह आरोपी अटक; लातूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

दिपक क्षीरसागर

लातूर: विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी भातांगळी पाटी येथे एका आरोपीस लातूर ग्रामीण पोलिसांच्या (Latur Police) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले आहेत. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भातांगळी येथून एक इसम एम एच १२ एफ एन १९०५ क्रमांकांच्या दुचाकीवर कमरेला गावठी कट्टा लावून भातांगळी पाटी मार्गे लातूरला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सदरील माहिती वरिष्ठाना कळवली.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्या पथकाने ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत भातांगळी पाटी येथे थांबले असता माहिती मिळालेल्या क्रमांकांच्या दुचाकीवरून एक इसम जाताना आढळला.

प्रकाश रामकिशन बेंबडे, भातांगळी या गावात राहणार असल्याचे त्याने सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी कट्टा, २ मॅगझीन, ६ जिवंत काडतूस विनापरवाना बाळगत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व १३५ म.पो.का.प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

Solo Trip: लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या ?

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणांची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT