Latur Accident Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident: कार- ट्रॅक्टरचा भीषण अपघात; चोघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ शिक्षकांचा समावेश

Latur News : लातूर जिल्ह्यातील तुळजापूर- औसा महामार्गावर हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : तुळजापूर- औसा महामार्गावर रात्रीच्या सुमारास कार व ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भिषण अपघात झाला. या अपघातात (Accident) चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तिन जण जिल्हा परिषदचे (Latur) शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.  (Tajya Batmya)

लातूर जिल्ह्यातील तुळजापूर- औसा महामार्गावर हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचे इंजिन बाहेर निघून काही दूर अंतरावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार पूर्णपणे दाबली गेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढल्यानंतर औसा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौघांचा मृत्यू 

तुळजापूर- औसा महामार्गावर मध्यरात्री कार- ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बाबा पठान, जि. एम. बिराजदार, रनदिवे आणि राजू बागवान असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे समोर आली आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या पैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला करा विशेष उपाय; संकटं, अडथळे, पैशांची तंगी, अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT