Farmer Success Story Saam tv
महाराष्ट्र

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Latur News : लातूर जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र आता लातूर जिल्ह्यातील शेतकरी विदेशी फळ ड्रॅगन फ्रुट या फळबाग शेतीकडे वळला आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
औसा (लातूर)
: मराठवाड्यातला लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी पट्ट्या म्हणून ओळखला जातो. मात्र याच लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहे. शेतीत प्रयोग करत लातूरच्या मातीत विदेशी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतले जात आहे. यातून वर्षाकाठी एकरी साधारण १२ लाख रुपयांपर्यंत उत्पादन शेतकरी घेत आहे. 

लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, ऊस, उडीद हे पिके घेतली जातात. लातूर जिल्ह्यातल्या वातावरणाचा विचार केला असता जिल्ह्यातील पारंपारिक पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र आता लातूर जिल्ह्यातील शेतकरी विदेशी फळ ड्रॅगन फ्रुट या फळबाग शेतीकडे वळला आहे. अर्थात पारंपरिक शेती न करता नवीन प्रयोग करण्याकडे शेतकरी वळल्याचे दिसून येत आहे. 

दोन एकर क्षेत्रात लागवड 

लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावातील शेतकरी तानाजी यादव यांनी मागच्या दोन वर्षापासून दोन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. सुरुवातीला ड्रॅगन फूड लागवडीसाठी शेतकऱ्यांने चार लाख रुपये एकरी लागवड खर्च केला. यातून त्यांनी पहिल्याच वर्षी ८ लाख रुपये नफा कमावला आहे. ड्रॅगन फूडची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते आहे. हे फळपीक एकदा लागवड केल्यानंतर वीस वर्षाच्या कालावधीपर्यंत फळ देते. 

कमी पाण्यावर येणारे पीक 

ड्रॅगन फूड या पिकाला पाणी देखील खूप कमी लागत असल्याने लातूर सारख्या कमी पर्जन्यमान असणाऱ्या परिसरात हे उत्तम पीक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फूड लागवडीसाठी आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जिल्हा बँकेकडून देखील ड्रॅगन फूड लागवडीसाठी आर्थिक मदत करण्यात येते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फूड शेती हे वरदान ठरते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT