Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक; हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

Latur : राज्यातील सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी सरकारने दिलेली ३१ जानेवारीची डेडलाईन जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रा बाहेर मागील आठ दिवसापासून रांगेत उभे आहेत

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र हमीभावासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अचानक सोयाबीन माप बंद झाल्याने लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनने भरलेले ट्रॅक्टर घेऊन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

राज्यातील सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी सरकारने दिलेली ३१ जानेवारीची डेडलाईन आता जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने सोयाबीन विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रा बाहेर मागील आठ दिवसापासून रांगेत उभे आहेत. अचानक गर्दी वाढल्याने वाहनांच्या रांगा या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत खरेदी केंद्रा बाहेर लागत आहेत. त्यामुळे नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राची तारीख ही वाढवून मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र यावर काही तोडगा निघालेला नाही. 

नागझरीच्या खरेदी केंद्राला माजी आमदार देशमुख यांची भेट
लातूर जिल्ह्यातल्या जवळपास ५४ हमीभाव खरेदी केंद्रावरील सोयाबीनचे मोजमाप आज अखेर पोर्टल बंद झाल्याने ठप्प झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मागच्या आठ दिवसापासून रांगेत उभे राहूनही सोयाबीन विक्री अचानक बंद झाल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना आता काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी भेट देत संवाद साधला.

शेतकऱ्यांनी काढला मोर्चा 

सोयाबीन खरेदीसाठी सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद करून सोयाबीनची खरेदी थांबविली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे. नोंदणी करून खरेदी करण्याची मुदत तीन दिवसांची राहिली असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. या अनुषंगाने मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यामुळेच आज दुपारच्या वेळी सोयाबीनने भरलेले ट्रॅक्टरचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT