Latur News
Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur: पोलिस ठाण्यासमोरच दगडे टाकून अडीच तास रस्ता अडवला; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलन

दीपक क्षीरसागर

लातूर : निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील एकाचा मोटारसायकल अपघातात (Accident) मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकानी पोलिस (Police) ठाण्यासमोर दगडे टाकून तब्बल अडीच तास मुख्य रस्ताच ठिय्या करून अडवला. यावेळी पोलिस निरीक्षकांना घेराव घातला. (Latur Police News)

निलंगा (Nilanga) तालुक्यातील लांबोटा येथील अतुल वसंतराव तुरे (वय ३२) हा संध्याकाळी निलंगा येथून गावाकडे जात असताना साडेदहाच्या सुमारास (Latur) लातूर- जहीराबाद महामार्गावर केडीया दाळ मिलच्या समोर दोन मोटार सायकलमध्ये समोरासमोर धडक लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतुल तुरे याचा मृत्यू झाला. पोलिस ठाणे निलंगा येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र हा अपघात नसून गावातीलच व्यक्तीने घातपात केला असून दोन्ही मोटार सायकलचे कोठेही नुकसान झाले नाही; असा आरोप करत मृताच्या नातेवाईकानी संबंधित व्याक्ती विरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल करावा. म्हणून निलंगा शहरातील पोलिस ठाण्याजवळच रस्त्यावर दगडे टाकून पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांना घेराव घालून तब्बल अडीच तास मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.

नातेवाईक आक्रमक

भर रस्त्यावर दगडे टाकून रस्ता अडवल्याने शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या दरम्‍यान पोलिस निरीक्षकास घेराव घालत गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक केल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक संताप व रोष व्यक्त करीत ठाम होते. शिवाय मृताचे नातेवाईक कारवाई करा म्हणून ठाम राहत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Today's Marathi News Live: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT