पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट (Gas Tanker Explosion At Chakan) झाला. खेड तालुक्यातील मोहितेवाडी परिसरामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट नेमका कसा झाला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर महामार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही घटना घडली. गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट झाला. गॅसच्या टँकरमधून चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झाले. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटामुळे आसपासचा परिसर हादरला. हा स्फोट झाल्यानंतर स्फोटाशीसंबंधित असलेले सर्वजण पसार झालेत.
टँकरला लागलेली आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या समोर सुरू होता. एका टँकरमधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं. अशात गॅसचा स्फोट झाला. घटनास्थळी तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती.
या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना देखील मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. याप्रकरणी चाकण पोलिस घटनेचा तपास करत आहेत. गेल्या वर्षी अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. तेव्हा देखील गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.