Latur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Latur Vidhan Sabha : लातूर शहरात काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप लावणार ताकद?

Latur news : लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून सलग ५ वेळा प्रतिनिधित्व केले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
Latur City Vidhan Sabha Election 2024
: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच लातूर शहर विधानसभेच राजकीय वातावरण तापल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित देशमुख हे पुन्हा विजय मिळविण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांना यावेळी भाजपाकडून तगड आव्हान देण्याची तयारी सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

लातूर (Latur) शहर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून सलग ५ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तर विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अमित देशमुख (Amit deshmukh) हे गेल्या तीन टर्मपासून लातूर शहर विधानसभेच प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसची पकड मजबूत आहे. मात्र असं असले तरी यावेळी भाजपाकडून अमित देशमुख यांना तगड आव्हान देण्यासाठी योग्य उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. 

तिरंगी लढत होण्याची शक्यता 

अशातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसचे घर फोडत काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनेला भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. पक्षाने संधी दिल्यास मोठ्या ताकतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच डॉ. अर्चना पाटील सांगत आहेत. ३ लाख ९८ हजार ३०० मतदार संख्या असलेल्या लातूर शहर मतदार संघात यंदाही तिरंगी लढत होणार आहे. 

काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत 
दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकी लातूर शहर विधानसभेत देखील तिरंगी लढत झाली होती. मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा मानावा तेवढा प्रभाव मतदारसंघात दिसला नाही. त्यामुळे थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली होती. या लढतीत अमित देशमुख यांनी तिसऱ्यांदा ४० हजार ४१५ मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. मात्र या वेळेला भाजपकडून  डॉ. अर्चना पाटील चाकूरकरांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार जरी आता फायनल झाला नसला, तरी यावेळीस लातूर शहर विधानसभेची निवडणूक ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेशी आणि चुरशीची राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT