Latur News Saam tv
महाराष्ट्र

भोंगा लावण्यासाठी ३५० जणांनीच घेतली अधिकृत परवानगी

भोंगा लावण्यासाठी ३५० जणांनीच घेतली अधिकृत परवानगी

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यात ७०० मश्जिदी आणि १२०० मंदिरांची अधिकृत नोंद असून यातील ३५० जणांनीच भोंगा लावण्याची पोलीस प्रशासनाकडून परवानगी मागितली आहे. मागणी करणाऱ्या या सर्वच्या सर्व संस्थांना पोलीस प्रशासनाच्यावतीने नियम व अटीच्या आधारे भोंगा लावण्याची परवानगी देण्यात आल्‍याची माहिती पोलीस (Police) प्रशासनाने दिली आहे. (latur news Only 350 people took official permission to blow the bhonga)

राज्यात सध्या भोंग्यावरुन प्रचंड (Latur News) गदारोळ सुरू असून आरोपी प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांवर पवित्र रमजान सण येवून ठेपलेला आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार परवानगी देण्यात येत आहे. या संदर्भ कायद्याच्या तरतुदीमध्ये काही गोष्टीला बंधने आहेत. तर काही गोष्टींवर बंधन नाहीत. त्यासाठी परवानगी लागते. ही परवानगी असेल तर आपण समर्थपणे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो.

भोंगाच्या आवाजाची मर्यादा किती

सध्या भोंगा या विषयावरून काही ठिकाणी वाद निर्माण होतोय. तर काही लोक आक्षेप नोंदवत आहेत. काही लोकांना त्याबद्दल शंका आहे. कायद्यातील तरतुदीचा सर्वांनी अभ्यास केला; तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे स्पीकर वापरण्यावर बंदी नसून स्पीकर भोंगाच्या आवाजाची मर्यादा किती असावी याच्यावर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT