Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur : लातूर जिल्ह्यातील काही भागात भूगर्भातून आवाजाचा भास; गावकऱ्यांनी रात्र काढली रस्त्यावर

Latur News : कलांडी, खडक उमरगा आणि डांगेवाडी या भागात भूगर्भातून आवाज झाल्याचा भास ग्रामस्थांना झाला आहे यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी भीतीपोटी रात्र रस्त्यावरच काढली आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. अशात रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात भूगर्भातून आवाज येत असल्याचा भास नागरिकांना झाला. या गूढ आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या भीतीतून लातूरच्या कलांडी, खडक उमरगा, डांगेवाडी परिसरातील गावकऱ्यांनी रात्र रस्त्यावर जागून काढली. 

आज किल्लारी भूकंपाला ३२ वर्षे पूर्ण झालेत. या महाप्रलयकारी भूकंपाच्या आठवणी मनात आजही कायम आहेत. यानंतर लातूर जिल्ह्यात आठ दिवसात मुरुड आकोला, बोरवटी, उस्तुरी, बडूर या भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे देखील नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच भूगर्भातून वेगळा आवाज येत असल्याचा भास जिल्ह्यातील काही गावांमधील ग्रामस्थांना झाला आहे. 

३२ वर्षात ८९ वेळा भूकंप झाल्याची नोंद 

दरम्यान किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र या ३२ वर्षात जिल्ह्यात ८९ वेळा भूकंपाचे धक्के झाल्याची नोंद भूकंपमापक यंत्रावर झाली आहे. अधूनमधून होत असलेल्या या घटनांमुळे आजही लातूर जिल्ह्यातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. तर वैज्ञानिक विषयक संस्थाचे संशोधनाकडे दुर्लक्ष आहे. यातच गूढ आवाजाने नागरिकांमध्ये अधिक घबराट पाहण्यास मिळत आहे. 

ग्रामस्थांनी रात्र काढली रस्त्यावर 
रात्री निलंगा तालुक्यातल्या कलांडी, खडक उमरगा आणि डांगेवाडी या भागात भूगर्भातून आवाज झाल्याचा भास ग्रामस्थांना झाला आहे. आवाज कोठून येतोय याचा शोधाशोध केला असता भूगर्भातून आवाज येत असल्याचा भास झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी रात्र रस्त्यावरच काढली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भरधाव कार कालव्यात कोसळली, नवरा बायकोचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, पैठणमध्ये भयंकर अपघात

Holi Special Dahi Vada Recipe : होळीला नाश्त्यासाठी खास बनवा दही वडा, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

Rashmika Mandanna : विजयच्या आधी १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपुडा झाला पण लग्न मोडले, नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता, कारण काय?

SCROLL FOR NEXT