Latur Husband Wife Death News Saam TV
महाराष्ट्र

Latur News: पत्नीच्या निधनाचे वृत्त कळताच पतीनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी घटना

Latur Husband Wife Death News: पत्नीचं सकाळी निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर

Latur Husband Wife Death News: लग्न म्हणजे सात जन्माचं नातं असल्याचं मानलं जातं. ते पती-पत्नींमधलं अतूट नातं असतं. लग्नानंतर दोघांमधलं विश्वासाचं नातं खूप महत्त्वाचं असतं. कितीही संकटं आली, तरी एकमेकांची साथ असेल, तर प्रत्येक संकटावर मात करणं शक्य होतं.

पती-पत्नी उतार वयातही एकमेकांना आधार असतात. दोघेही एकमेकांना म्हातारपणाची काठीच समजतात. पण जर एकाने साथ सोडली तर दुसऱ्याचं काय होणार? अशीच मन हेलावून टाकणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. (Breaking Marathi News)

पत्नीचं सकाळी निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडल्याची घटना घडली आहे. लातूर (Latur News) जिल्ह्यातील होळी (ता. औसा) गावात बुधवारी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव (वय १०७) यांनाही धक्का बसला.

एकीकडे घरात पत्नीच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण पसरले होते. गावातून नातेवाईक घरी येत होते. पण अडीच तासांनी पत्नीच्या निधनाच्या दुःखातच बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदाशिव जाधव यांनी सुद्धा प्राण सोडले.

एकाच दिवशी अडीच तासांच्या आत पत्नीपाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडल्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वयाच्या अखेरच्या टप्प्यात आपला साथीदार सोडून गेल्यामुळे सदाशिव जाधव यांनी प्राण सोडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्याही पार्थिवांवर गुरुवारी सकाळी ९ वाजता होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली चार मुले असा परिवार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Point Table: पावसामुळे IPLच्या पॉईंट्स टेबलवर मोठी उलटफेर; कोणत्या संघाचं बिघडलं गणित? कोण-कोणत्या संघाच्या पॉईंट्सवर फेरलं पाणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा; माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

Mumbai : "मी पोलिस अधिकारी बोलतोय..." मुंबईतील तरुणीची क्रिकेटरकडून फसवणूक, ३२ लाख उकळले

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

१९७८ साली ५० हजारांना घेतला फ्लॅट, पण पझेशनच मिळालं नाही; अखेर 48 वर्षांनी मिळाला न्याय; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT