Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur : सावधान! लातूरमध्ये घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह; मानवालाही होऊ शकते संक्रमण, ३० घोड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी रवाना

Latur News : अतिशय दुर्मिळ असलेल्या ग्लॅन्डर्स हा आजार प्रामुख्याने घोड्यांमध्ये आढळून येत असतो. घोड्यांमध्ये नाकातून पू येणे, फोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येत असतात

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: राज्यात कोरोनाचा आजार पसरत असताना माणसाला संक्रमित होणार ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन, संक्रमक रोगाचा प्रादुर्भाव  लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका घोड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून चार घोडे  ग्लँडर्स सदृश्य आजाराने संशयित आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून तातडीने  नमुने घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.

अतिशय दुर्मिळ असलेल्या ग्लॅन्डर्स हा आजार प्रामुख्याने घोड्यांमध्ये आढळून येत असतो. घोड्यांमध्ये नाकातून पू येणे, फोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येत असतात. लातूर जिल्ह्यात एका घोड्यामध्ये ग्लॅन्डर्स आजार झाल्याचे समोर आले आहे. तर प्रामुख्याने या रोगात माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असणाऱ्या झूनॉटिक रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.

घोड्याला दयामरण 

दरम्यान हा आजार मानवी संक्रमक असल्याने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाच आहे. एका घोड्यात ग्लॅन्डर्स पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यानुसार प्रशासनाने तातडीने घोड्यांचे नमुने घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या २१ घोड्यांच्या नमुन्यांपैकी चार नमुने हे संशयास्पद आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील एक घोडा ग्लॅन्डर्स पॉझिटिव आल्याने त्याला तात्काळ जिल्हा प्रशासनाने दयामरण दिले आहे. 

३० नमुने तपासणीसाठी हरियाणाला 

बाधित घोड्याचा इतर पशूंना आणि मानवांना संसर्ग होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर ३० संशयित घोड्यांचे नमुने देखील हरियाणा येथे पाठविण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बाधित झालेल्या पाच किलोमीटर क्षेत्रातील घोड्यांचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान घोड्यांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Navi Mumbai : नवी मुंबईत सशस्त्र दरोडा! व्हॅनमधून २० कोटींचं सोनं लुटलं; परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान

WhatsApp Update : व्हॉट्सॲपचा भन्नाट फीचर! परदेशातही मिळणार इंटरनेट, नंबर बदलण्याची गरजच नाही

SCROLL FOR NEXT