लातुर : गेल्या २० वर्षापासून मागणी करूनही स्मशानभूमीला शासन जागा देत नाही. यामुळे वैतागलेल्या लातुर जिल्ह्यातील हणमंतवाडी (ता. निलंगा) येथील ग्रामस्थांनी मयत महिलेचा अंत्यविधी (Funeral) गावातील चौकात ग्रामपंचायत (Gram Panchayat) समोरच केला. (latur news Funeral in front of the hanmantwadi Gram Panchayat on the decision of the village)
हणमंतवाडी हे गाव चार हजार लोकवस्तीचे असून अध्याप गावात स्मशानभूमी नाही. गेल्या विस वर्षापासून हणमंतवाडी येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा मागत आहेत. परंतु जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने प्रेताची अव्हेलना होत आहे. त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो.
गावानेच घेतला निर्णय
हणमंतवाडी गावात मयत (Latur News) झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. हणमंतवाडी गावातील ७० वर्षीय सोजरबाई रामचंद्र निकम या वृध्द महिलेचा वृध्दपकाळाने मृत्यू झाला होता. परंतु शासन गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करत नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करावा लागला. संपूर्ण गावानेच निर्णय घेतला व मयत वृध्द महिलेचा अंत्यविधी गावातील चौकात ग्रामपंचायत समोर अंत्यविधी केल्यावर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? म्हणून अंत्यविधी केल्याचे सांगितले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.