Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : लातूरमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Latur News : माजी मंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ सभेवेळी भाजपला सोडचिट्टी देत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लोकसभेच्या पराभवानंतर भाजपमधून नॉट रिचलेबल झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शृंगारे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

माजी मंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि धीरज देशमुख यांच्या प्रचार शुभारंभ सभेवेळी भाजपला सोडचिट्टी देत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावरच लातूर जिल्ह्यात भाजपाला मोठ खिंडार पडले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांनी विजय मिळवला होता. यानंतर मुद्दा झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळे यांनी पराभव केला होता. 

लोकसभा निकालानंतर भाजपमधून नॉटरीचेबल झालेले उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक होते. मात्र त्या ठिकाणची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आली. ती जागा परत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री सुधाकर शृंगार यांना देण्यात आली. नंतर आज सुधाकर शृंगारे यांनी थेट भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपाला लातूर जिल्ह्यात मोठे खिंडार पडल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT