Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : साखर झोपेत उकळते पाणी पडले अंगावर; दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी

साखर झोपेत उकळते पाणी पडले अंगावर; दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी

Rajesh Sonwane

संदिप भोसले  
लातूर
: सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी करत असतांना उकळते पाणी गाड झोपेत असलेल्या मुलींच्या (Latur) अंगावर पडले. यात दोन्ही सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी दवाखान्यात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

लातूर जवळच्या कव्हा गावात राहणारे महादेव शेळके हे लातूरच्या आडत मार्केटमध्ये हमालीचे काम करतात. त्यांना रोज कामाला जाण्यासाठी सकाळी लवकर उठाव लागत. आजही ते नित्यनेमाने त्यांनी पाणी गरम करण्यासाठी बकेटमध्ये हिटर लावलं. गरम पाणी असलेल्या बादलीखालचा पाटा घसरला आणि उकळत पाणी झोपलेल्या माहेश्वरी आणि योगेश्वरी यांच्या अंगावर पडले. असा अचानक प्रकार घडल्याने दोघी बहिणी किंचाळल्या. महादेव शेळके यांनी तातडीने लातूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केल. 

उपचारासाठी मदतीची अपेक्षा 

डॉक्टरांनी योगेश्वरी ९० टक्के तर माहेश्वरी ६० टक्के भाजल्याने दोघींच्या उपचारासाठी जवळपास बारा ते पंधरा लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. मात्र हमाल काम करणाऱ्या महादेव शेळके यांची परिस्थिती हालाखीची असल्याने ते एवढा खर्च कुठून आणावा, या चिंतेत पडले. हतबल झालेल्या महादेव शेळके यांना आतापर्यंत ५ लाखाची मदत समाजातून दिली आहे. परंतु आणखीन दहा लाख कमी पडल्याने मदतीच्या अपेक्षेत दोघी बहिणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT