Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : बिल काढून देण्यासाठी १५ हजाराची लाच; कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Latur News : लातूरच्या अहमदपूर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारा बळीराम सोनकांबळे व पंडित शेकडे या दोघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले
लातूर
: गावात कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या थकीत बिलाची रक्कम (Latur) काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली. १५ हजाराची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कनिष्ठ अभियंत्यासह एकास ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

लातूरच्या अहमदपूर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारा बळीराम सोनकांबळे व पंडित शेकडे या दोघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पाटबंधारे विभागातील या दोघांनी गावात केलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी १५ हजार रुपयाची (Bribe) लाच तक्रारदाराकडे मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. यात तथ्य आढळून आल्यानंतर पथकाने सापळा रचला. दरम्यान १५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले आहे. तर अहमदपूर पोलीस (Police) ठाण्यात या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK : हाय व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक सामन्यात पावसाचे सावट; दोन्ही संघांचे टेन्शन वाढले!

Mumbai Tourism : मुंबईजवळील 8 ऐतिहासिक किल्ले, एकदा तरी नक्की भेट द्या

Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन यांचा लेक झाला मालामाल; अभिषेकने मुंबईतील लग्जरी फ्लॅट विकला, नफा वाचून हैराण व्हाल

Maharashtra Live News Update : बीडच्या परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Child cancer myths: लहान मुलांमधील कॅन्सर संसर्गजन्य असतो? पालक करतायत ही गंभीर चूक, आधी सत्य जाणून घ्या

SCROLL FOR NEXT