ब्लिचिंग पावडर की राख? लातूर मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा डाव उधळला!
ब्लिचिंग पावडर की राख? लातूर मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा डाव उधळला! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

ब्लिचिंग पावडर की राख? लातूर मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा डाव उधळला!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी टेंडर मंजुरीचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. चार टक्के कमी दराचे टेंडर मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. संबंधित कंत्राटदार ब्लिचिंग पावडर देणार की राख असे म्हणत हे टेंडर मंजुरीचा विषय या बैठकीत फेटाळून लावण्यात आले. तसेच मार्च मध्येच वर्षभराची ब्लिचिंग खरेदीसाठी टेंडर काढावेत, तोपर्यंत जुन्याच कंत्राटदारांकडून ब्लिचिंग खरेदी करावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

हे देखील पहा :

स्थायी समितीचे सभापती ॲड. दीपक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते. शहरासाठी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी ISI मार्कची ग्रेड 1 ब्लिचिंग पावडर पुरवठा करणेसाठी २०२१-२२ करीता वार्षिक दर ई टेंडर ऑगस्टमध्ये काढण्यात आल्या होत्या. यात सहा टेंडर महापालिकेला प्राप्त झाल्या. ३१ ऑगस्टला टेंडरचा प्रथम (तांत्रिक) लिफापा उघडण्यात आला होता. यात सहा पैकी चार टेंडर वैध असल्याने दुसरा आर्थिक लिफाफा तीन ऑगस्टला उघडण्यात आला. यात अंदाजपत्रकीय रक्कम ४९ लाख २८ हजार रुपये होती.

यात श्री स्वामी समर्थ केमिकल्सची चार टक्के कमीचे टेंडर मंजूर करावी म्हणून पाणी पुरवठा विभागाने हा विषय मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावाला काँग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, रविशंकर जाधव यांनी तीव्र आक्षेप घेतला. यात नोव्हेंबरमध्ये टेंडरचा विषय आलाच कसा असे म्हणत त्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. वर्षभराच्या खरेदीचा विषय मार्चमध्ये टेंडर काढूनच करावा अशी सूचना त्यांनी केली.

या ब्लिचिंग पावडरच्या टेंडरमध्ये एक निविदा २९ टक्के जास्तीचे जाती तर एक टेंडर चार टक्केने कमीचे येते. यात दोन्हीत ३३ टक्केचा फरक आहे. त्यात कंत्राटदाराला दहा टक्के नफा हवा असतो. म्हणजेच कमी दरवाला महापालिकेला ब्लिचिंग ऐवजी राख देणार आहे का?, विभागाने रेट ॲनॅलेसिस का केले नाही असे म्हणत अधिकाऱयांना धारेवर धरले. त्यानंतर सभापती ॲड. मठपती यांनी हा विषय रद्द करीत जुन्या कंत्राटदाराकडूनच मुदतवाढ देवून मार्चपर्यंत ब्लिचिंग खरेदी करावी असा निर्णय दिला. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचा डाव उधळला गेला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT