Latur Accident news  saam tv
महाराष्ट्र

Latur : लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात दोघे जागीच ठार

लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला आहे.

दीपक क्षीरसागर

Latur News : लातूरच्या भातांगळी पाटीजवल एक भीषण अपघात झाला आहे. लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला आहे. कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे. चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या (Latur) उदगीरमधील सहा जण कारने लातूरला मुलगी पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी ते लातूरपासून जवळच असलेल्या भातांगळी पाटीजवळ येताच समोरून टेम्पो भरधाव वेगात आला. या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काकूर झाला. या अपघातात (Accident) समता नगरमधील रहिवासी तानाजी कुमदाळे आणि अन्य एक जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी लातूर येथील दिवगंत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. जखमींचा प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur Accident : एकाला वाचवण्याचा नादात दुसऱ्याचा गेला जीव; नागपुरातील घटना

नागपुरातील (Nagpur) काटोल तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली. सावरगाव जांब नदीच्या पुलावर अचानक दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नांदात कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ब्रेक मारताच हा दुचाकीस्वार बचावला. पण कंटेनरचा मागील भाग पूर्णपणे विरुद्ध दिशेने गेल्याने त्याची एका तरुणाच्या बाईकला धडक बसली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला.

अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना (Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. योगेश रमेश रिठे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. अपघातात कंटेनर चालक आणि वाहक देखील जखमी झाले आहेत. एकाला वाचवण्याच्या नांदात दुसऱ्या तरुणाचा जीव गेल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT