dheeraj deshmukh
dheeraj deshmukh 
महाराष्ट्र

लातूर DCC त सत्तेत आल्यानंतर आमदार धीरज देशमुख म्हणाले...!

दीपक क्षीरसागर

लातुर : लातुर (latur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (dcc bank) काँग्रेस प्रणित सहकार पॅनलची सत्ता आलेली आहे. या पॅनलेचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. तसेच भाजपच्या एका उमेदवाराचा नाणेफेकीवर विजय झाला आहे. जिल्ह्यातील विकासासाठी राजकारण हेच शिवराज पाटील चाकूरकर तसेच दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी घालून दिले आहे. त्यानुसार आगामी काळात काम करणे गरजेचे आहे असे मत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. latur dcc bank election result 2021

आमदार धीरज देशमुख म्हणाले ग्रामीण भागातील मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे. ताे सार्थ ठरवायचा आहे. त्यासाठी सामन्यांच्या आर्थिक आणि बँकिंगच्या समस्या सोडविणे. सामन्यांचा आर्थिक विकास कसा उंचावता येईल यावर काम करणे हे ध्येय उद्दीष्ठ ठेवले आहे.

दरम्यान देवणी येथील जागेवरील दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने भाजपाच्या लोकशाही पॅनलचे भगवानराव पाटील तळेगांवकर यांचा नाणेफेकीने विजय झाला. यामुळे आजच्या मतमाेजणीत आठ जागांवर काॅंग्रेस आणि एक जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी झाल्याचे घाेषित करण्यात आले.

edited by : siddharh latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT