Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : सख्खे भाऊ बनले पक्के वैरी; शेतीच्या वादातून तीन भावांनी केला बाप- लेकाचा खून

Latur News : लातूर जिल्ह्यातील उस्तुरी या गावातील सुरेश बिराजदार यांचा अनेक वर्षांपासून भाऊ बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांचाशी शेतीवरून वाद होता. अनेकदा त्यांची भांडणे देखील झाली होती

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : वडिलोपार्जित असलेल्या शेतजमिनीवरून भावांमध्ये वाद सुरु होता. याचा शेतीच्या वादातून सख्या तीन भावंडांनी मिळून बाप-लेकाचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिघा मारेकरीना अटक केली असून कासार शिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला करण्यात आला आहे. 

लातूर जिल्ह्यातील उस्तुरी या गावातील सुरेश बिराजदार यांचा गेल्या अनेक वर्षांपासून भाऊ बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांचाशी शेतीवरून वाद सुरु होता. यावरूनच अनेकदा त्यांची भांडणे देखील झाली होती. हे प्रकरण पोलिसात जाऊन परस्परविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले होते. दरम्यान हा वाद मिटविण्यासाठी गावातील अनेकजणांनी या भावांची समजूत काढली होती. मात्र भावांमधील हा वाद मिटत नव्हता. 

अचानक येऊन मारहाण करण्यास सुरवात 

दरम्यान सुरेश बिराजदार व ऱ्यांचा मुलगा गणेश व साहील हे १६ जानेवारीला शेतात काम करीत होते. याच वेळी त्यांचे तिघे भाऊ बसवराज, सुनिल, लखन बिराजदार हे शेतात आले. या तिघांनी मिळून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने वडील आणि मुलगा दोघे जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या तिघांनी केलेल्या जबर मारहाणीत सुरेश बिराजदार (वय ५०) व मुलगा साहिल (वय २२) यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी आहे. 

तिघे भाऊ पोलिसांच्या ताब्यात 

जखमी गणेश यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजु हिंगमिरे, बळीराम म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले. तर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT