भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली श्रेयवादाची लढाई, तर विकास खुंटल्याचा सेनेचा आरोप दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

भाजप-राष्ट्रवादी मध्ये जुंपली श्रेयवादाची लढाई, विकास खुंटल्याचा सेनेचा आरोप

सध्या औसा शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : सध्या औसा शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. तर, औसा शहराचा विकास खुंटला असून त्याबद्दल आंदोलन करत राहणार असा आरोप सेनेने केला आहे. श्रेय कोणीही घ्या पण, विकास कामे करा अशी गुगली शिवसेनेने टाकली आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औसा इथं श्रेय वादाचा कलगीतुरा रंगला आहे.

औसा पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने घेतलेल्या विकासकामांचे सर्वच निर्णय 5 डिसेंबर 2019 या शासन निर्णयाने स्थगिती देण्यात आली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना गुंडाळण्याचे संकेत लक्षात येताच राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष अफसर शेख यांनी यातील सर्व अडथळे दूर करत मंजुरी मिळवली सदरील कार्यादेश हे नवीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली असल्याचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.

हे देखील पहा -

तर, याउलट औसा माकणी पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव नव्याने अंदाजपत्रक तयार करून त्यातील नव्या दरानुसार डीपीआर तयार केला 16 नोव्हेंबर 2018 ला दहा लाख रुपयांच्या तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे भरले व त्यानंतर 25 लाख रुपये भरले असे एकूण 35 लाख रुपये या पाणीपुरवठा योजनेसाठी दहा टक्के वाटा नगरपालिका निधीतून तंत्रिक फी म्हणून भरली. यावेळी औसा राजकारणात आमदार अभिमन्यू पवार यांचा प्रवेश झाला नव्हता त्यानंतर सदरील काम रद्द होण्याची स्थिती असतानाच सदरील कामाचे कार्यादेश ज्या अडचणीमुळे राहिले होते ते दूर केले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी सांगितले आहे.

औसा शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प येथून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणं महत्त्वाचं होतं यासाठी विद्यमान आमदार अभिमन्यु पवार हे युती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तयारी करत होते. त्यावेळी औसा व्हिजन अंतर्गत युती सरकारच्या काळात सर्व प्रकारच्या मंजुऱ्या घेतल्या व औसा शहराचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले असल्याचा दावा भाजपाचे नेते किरण उटगे यांनी केला आहे.

तर, दुसरीकडे औसा शहरात झालेल्या विविध विकास कामासंदर्भात राज्य शासनाने अर्थात महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला पण शहरातील विविध गल्ली व अंतर्गत रस्ते गटारी सांडपाण्याचा योग्य निचरा याबद्दल चे कामकाज करताना अनेक भाग उपेक्षितच राहिला. शहरातील मध्यवर्ती रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे, यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय वादाचा कलगीतुरा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या तरंगला असताना श्रेय कोणीही घ्या पण विकास कामे दर्जेदार करा असा टोला शिवसेनेच्या नेत्या जयश्री उटगे यांनी लगावला.

एकंदरीतच काही महिन्यानंतर होऊ घातलेल्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी काँग्रेस व विकास कामाच्या श्रेयवादात औसेकर निवडणूकित काय कौल देणार हे आगामी काळात चित्र स्पष्ट होईल मात्र विकास कामाच्या श्रेयावादाचा आखाडा मात्र जोरदार रंगला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT