संदीप भोसले, साम टीव्ही
Latur Nilanga Husband Wife Accident News: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अशातच केवायसी (PM Kisan KYC) करण्यासाठी बँकेत निघालेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा (Latur Accident) तालुक्यातील संगारेड्डीवाडी पाटीजवळ शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. तानाजी ज्याेतीराम खामकर (वय ५५) आणि सुकुमारबाई तानाजी खामकर (वय ५०) असे मयत पती-पत्नीची नावेत आहेत.
या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथील तानाजी ज्योतीराम खामकर आणि त्यांची पत्नी सुकुमारबाई खामकर हे दोघे शुक्रवारी दुपारच्या सुमारास औराद शहाजानी येथील बँकेत शेतकरी सन्मान निधीकरिता केवायसी करण्यासाठी निघाले होते.
दोघेही दुचाकीवरून जात असताना संगारेड्डीवाडी पाटीजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रँक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Nilanga Accident News) दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये या अपघातात तानाजी खामकर व त्यांची पत्नी सुकुमारबाई खामकर हे जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच औराद शहाजानीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.