Latur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Latur Accident News: महाविद्यालयात प्रवेश घेऊन परतताना अपघात; बहिण भावाचा जागीच मृत्यू

महाविद्यालयात प्रवेश घेऊन परतताना अपघात; बहिण भावाचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले

लातूर : बहिणीने आपल्या लहान भावाचा लातूर येथील महाविद्यालयात प्रवेश घेऊन दुचाकीने गावाकडे परतले हेाते. या दरम्‍यान (Latur) लातूर– नागपूर महामार्गावर भरधाव वेगातील टिप्परन यांच्या दुचाकीला (Accident) जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही भावंडे जागीच ठार झाले आहेत. (Live Marathi News)

अंबुलगा (ता. चाकूर) येथील निकिता शिवराज रकताटे (वय २०) व अवधूत शिवराज रकता (वय १८) असे या मयत भावंडाचे नाव आहेत. निकिता रकताटे ही लातुरमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान, सोमवारी तिचा भाऊ अवधूत रकताटे याचा लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यात आला. ही प्रवेश प्रक्रिया पार पाडून दुपारी हे बहीण- भाऊ आपल्या दुचाकीवरुन त्यांच्या मूळ अंबुलगा गावाकडे परतत होते. ते आष्टामोड येथे खडीने भरुन लातूरकडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने त्यांना त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बहीण- भावाचा जागीच मृत्यू झाला.

परिवाराचा आक्रोश

अपघाताची माहिती मिळताच चाकूरचे पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोहेकॉ. भागवत मामडगे, विष्णू गुंडरे, पांडुरंग दाडगे, आकाश कातपूरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ टिप्पर पोलिस ठाण्यात नेले. त्‍यांच्‍या मृत्‍यूंची बातमी गावात समजताच परिसरात मोठी शोककळा पसरली. तसेच कुटूंबाने एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT