संदीप भोसले
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर शहरातल्या तावरजा कॉलनी भागातमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
फुग्यात हवा भरणाऱ्या नायट्रोजन हेलियम गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात फुगे विक्रेत्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर फुगे घेण्यासाठी आलेले 11 लहान मुले देखील गंभीर जखमी झाले आहेत.
राम इंगळे (वय 45) असं मयत फुगेवाल्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातल्या वाघाळा-राडी येथील तो रहिवासी होता. तो आज फुगे विकत लातूर शहरातल्या तावरजा कॉलनीत आला होता. मात्र फुग्यात हवा भरतानाचा सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे.
जखमी बालकांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी जखमी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली. अशा अनधिकृत स्फोटक वस्तू घेऊन फिरणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ सरकारने बंदी घालावी, अशी मागणी जखमी मुलांचे पालक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.