Nitesh Rane News Saam TV
महाराष्ट्र

Nitesh Rane News: महाविकास आघाडीची 'गौतमी पाटील' म्हणजे संजय राऊत...; नितेश राणेंची बोचरी टीका

Sanjay Raut Compare With Gautami Patil: नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटीलशी केली आहे.

Ruchika Jadhav

विनायक वंजारे

Sindhudurg News: राणे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात नेहमीच खटके उडत असतात. त्यांतील वाद एकदा पेटला की, राजकीय वातावरण चांगलच तापतं. दोन्ही बाजूंनी आरोपांच्या आणि टीकेच्या फैरी झडत असतात. अशात आता नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटीलशी केली आहे. (Latets Political News)

सिंधुदूर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे (Nitesh Rane) बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत राऊतांवर निशाना साधला. "महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत. रोज सकाळी मनोरंजन करतात. असं राऊतांना स्वत:लाच वाटत आहे, ते दूर झालं पाहिजे. त्या गौतमी पाटीलला मी विनंती करतो की तिचं मेकअपचं सामान राऊतांना द्यावं, अशी जहरी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे.

गजानन कीर्तिकर यांच्या खळबळजनक वक्तव्यावर संजय राऊतांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना भाजपमधून वेगळी का झाली असं सागंत भाजपवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी भाजपचा मगर आणि अजगर असा उल्लेख केला. राऊतांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले की, " उद्धव ठाकरे स्वत: त्यावेळी आमदार खासदारांना अपमानित करत होते. बाहेर लोकं तासनतास बसून राहायचे पण उद्धव ठाकरे भेटायचे नाहीत.

महाविकास आघाडीत असताना अजित पवारांनी किती निधी दिला. सर्वात कमी निधी शिवसेना आमदारांना अजित पवारांनी दिला. भाजपासोबत असताना देवेंद्रजी अधिक मान द्यायचे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

संजय राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करतायत

नितेश राणे यांनी पुढे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, संजय राऊतांमुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. असे असून देखील उद्धव ठाकरे त्यांना बाजूला करत नाहीत, राऊतांजवळ असं आहे तरी काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला आहे.

उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणू अशी धमकी संजय राऊतांच्या भावाने या आधी दिली होती. उद्धव ठाकरे व कुटुंबीय एक महिन्यासाठी लंडनला जातायत. त्यांनी लवकर जावे सुट्टीची गरज आहे. तुम्ही परत याल तेव्हा तुमच्या सोबत किती आमदार असतील त्याचा अनुभव घ्यावा. याला कारण म्हणजे संजय राऊतचा सकाळी वाजणारा भोंगा आहे, असा सल्ला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT