Palghar News Saam TV
महाराष्ट्र

Palghar News: पालघरचा 'श्रावणबाळ'! आईला होणारा त्रास सहन झाला नाही; १४ वर्षांच्या मुलाने घराजवळच खोदली विहीर

Ruchika Jadhav

Palghar Pranav Ramesh Salkar: आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊनये यासाठी प्रत्येक आई मुलांची योग्य काळजी घेते. स्वत:ला कमी जेवण मिळाले तरी मुलांचे पोट भरते. अशात पालघरच्या एक मुलाने आपल्या आईच्या काळजीपोटी एकट्यानेच चक्क विहीर खोदली आहे. आईसाठी त्याने केलेली ही कामगिरीपाहून सर्वच स्थरांतून त्याचं कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या कळवे या गावातील प्रणव रमेश सालकर या तरुणाने ही कामगिरी केली आहे. प्रणव सध्या इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. प्रणव त्याचे आई बाबा आणि चार भावंड असा त्यांचा परिवार असून कळवे येथेच एका छोट्याश्या झोपडीत तो राहतो.

आईसाठी खोदली विहीर

प्रणवकडे पाहिलं तर वाटतं की, हा फक्त एक हाडांचा सापळा आहे. मात्र या मुलाने आपल्या मेहनतीने आख्खी विहीर खणली आहे. विहीरीला पाणी लागले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या मुलाची कामगिरी पाहून त्याच्या आईबाबांच्या डोळ्यांत आश्रू दाटले.

जेवणासाठी फक्त १५ मिनीटांचा ब्रेक

या कोवळ्या मुलाने विहीर खोदत असताना दिवस रात्र काम केले. या वयात त्याच्याएवढी अन्य मुलं मस्त मजाहजा करत होते. इकडे तिकडे बागडत होते. तसेच मोबाई गेमींगमध्ये व्यस्त होते. मात्र प्रणवने असे काहीही न करता आपलं संपूर्ण लक्ष विहीर खोदण्याकडे दिलं. काम सुरु असताना तो जेवणासाठी फक्त १५ मिनीटांचा ब्रेक घेत होता.

का खोदली विहीर?

प्रणवला त्याने इतकं मेहनतीचं काम का केलं? विहीर का खोदली असं विचारल्यावर त्यानं म्हटलं की, माझी आई आणि बाबा दोघेही पाणी भरण्यासाठी फार दूर जात होते. परिसरात असेल्या गटारावर एक पाईपलाईन आहे. तेथूनही आई पाणी भरायची. माला ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. त्यामुळे मी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला, असं प्रणव म्हणाला.

त्याने खोदलेल्या या विहीरीमुळे सर्वच स्थरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावातील शिक्षकांनी देखील त्याची ही विहीर पाहण्यासाठी गावाबाहेर गर्दी केली होती. त्याने खोदलेल्या विहिरीवर एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे. यावर प्रणवने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT