Nagpur : द्यायचे होते साडेतीन कोटी, चुकून एक शुन्य वाढल्याने गेले 35.63 कोटी  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur : द्यायचे होते साडेतीन कोटी, चुकून एक शुन्य वाढल्याने गेले 35.63 कोटी

आजकाल आपण प्रत्येक जण बँकेंचे व्यवहार शक्यतो ऑनलाईन (Online) पद्धतीने करत असतो अशामध्ये जर आपल्याकडून एखादा आकडा कमी जास्त झाला तर पुर्ण व्यवहार चुकीचा होऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : आजकाल आपण प्रत्येक जण बँकेंचे व्यवहार शक्यतो ऑनलाईन (Online) पद्धतीने करत असतो अशामध्ये जर आपल्याकडून एखादा आकडा कमी जास्त झाला तर पुर्ण व्यवहार चुकीचा होऊ शकतो. असात एक प्रकार नागपूरात घडला असून चुकून एक शून्य वाढल्याने सरकारने (Government) एका खात्यामध्ये अतिरिक्त 32 कोटी जमा केल्याची घटना समोर आली आहे.

नागपूरच्या (Nagpur) मेयो रुग्णालयात हा प्रकार घडला आहे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून साडेतीन कोटी मिळणार होते. मात्र 1 शून्य वाढल्यामुळे त्यांना 35.63 कोटी मिळाले आहेत.

सरकारने GR काढून 10 कोटी रिटर्न घेतले असले तरी उर्वरित पैशांचं काय झालं याचा अजून पत्ता लागलेला नाही. सरकारला मेयो रुग्णालयाला (Mayo Hospital) 3.5 कोटी रुपये द्यायचे होते. पण, चुकून एक शून्य जास्त प्रेस झाला. 35 कोटी 63 लाख रुपये मेयोच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही चूक येताच त्यांनी ही अतिरिक्त रक्क्म परत घेण्याची विनंती शासनाला केली शासनाने परिपत्रक काढून दहा कोटी 43 लाख रुपये परत घेतले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: अचानक ही 7 लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर!

Govinda: गोविंदासोबत एयरपोर्टवर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' कोण? सुनीता आहुजांनी याच नावाचा केला होता उल्लेख

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर संतापल्या

स्वप्नात अचानक कपडे फाटले, 'या' मोठ्या संकटाचं संकेत तर नाही ना?

EPFO New Rules: पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले! आता 'या' गोष्टीशिवाय क्लेम होणार रिजेक्ट; पाहा नवीन नियम

SCROLL FOR NEXT