Sharad Pawar News saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्यांसह पदाधिकारी शिंदे गटात करणार प्रवेश

मुंबईत शिवसेना युवा नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

राजेश काटकर

Political News: परभणीत शिवसेनेकडून (शिंदे गट) राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जोरदार धक्का मिळाला आहे. जिल्ह्यातील 12 पेक्षा अधिक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी आमदारांबरोबर अनेक बडे पदाधिकारी आज शिंदे गटात दाखल होणार आहेत. मुंबईत शिवसेना युवा नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Latest Political News)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी बरोबर ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय. आज देखील अनेक बडे चहेरे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशात सर्वाधिक चेहेरे हे राष्ट्रवादीचे असणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांपैकी सहा जागा पहिल्यांदा शिवसेनेचे नेते सईद उर्फ गब्बरखान यांच्या नेतृत्वात आणत आमदार बाबाजानी यांना आव्हान निर्माण केले आहे. यापूर्वी सईदउर्फ गब्बरखान यांच्या नेतृत्वात अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकत वाढताना दिसत आहे.

राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता; पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता असताना आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आज भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडत आहेत. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे.येत्या 8-9 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला सोनं खरेदी का करतात? आयुष्यात होतो 'हा' मोठा बदल

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT