Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: चिंता वाढली! राज्यात ४४,३८८ नव्या रुग्णांची नोंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ४४ हजार ३८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १५ हजार ३५१ रुग्णा कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ६५,७२,४३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९८ टक्के आहे.

गेल्या २४ तासात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०४ टक्के एवढा आहे. राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होम क्वारांटाईन असून २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे २०७ रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण १२१६ ओमिक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

SCROLL FOR NEXT