Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News: भररस्त्यात तरुणावर तलवारीने सपासप वार; धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

Akola Crime: या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

Jayesh गावंडे

Crime News: अकोला येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भर रस्त्यात या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिव्हील लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिखलपुरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आकाश वाकोडे असं मृत मुलाचं नाव आहे. पाच ते सहा मुलं काल रात्री त्याच्या अंगावर धावून आले. यावेळी आकाश आपल्या मित्रासह रस्त्यावर उभा होता. आपल्यावर अशापद्धतीने हल्ला होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

पप्पू विनोद टोबरे असं हल्लेखोराचं नाव आहे. या तरुणासह आणखीन ५ ते ६ मुलांनी आकाशवर तलवारीने सपासप वार केले. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रावर देखील तरुणांच्या टोळक्याने वार केले. सुदैवाने आकाशचा मित्र यात बचावला आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुना वाद काय होता?

वर्षभरापूर्वी चिखलपुरा भागात सुहास वाकोडे आणि आकाश यांनी पप्पू विनोद टोबरे याच्यावर हल्ला केला होता. या वादातून पप्पू विनोद टोबरे याच्यासह पाच ते सहा जणांनी धारदार तलवारीने चिखलपुरा रोडवर उभ्या असलेल्या आकाश वाकोडे युवकावर हल्ला चढवला. धारदार तलवारीचे अनेक घाव आकाशच्या शरीरावर घातल्यामुळे आकाश वाकोडे याचा जागीच मृत्यू झाला तर या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अकोला सिव्हील लाईन पोलीस (Police) स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी दोघांना पोलिसानी ताब्यात घेतल्याची माहिती असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT