Young Man Tortured to Death Over Alleged Relationship Saam
महाराष्ट्र

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

Young Man Tortured to Death Over Alleged Relationship: नांदेडमध्ये २१ वर्षीय तरूणाची कर्नाटकात हत्या केली. विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणाचा जीव घेतला.

Bhagyashree Kamble

  • २१ वर्षीय तरुणाची हत्या.

  • कर्नाटकातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याला ठार मारलं.

  • हैदराबादमध्ये उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातीस गोणेगाव येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. २१ वर्षीय तरूणाचा प्रेमसंबंधातून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरूणाचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याचा प्रेमसंबंधातून महिलेच्या नातेवाईकांनी तरूणाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

विष्णूकांत पांचाळ (वय वर्ष २१) असे मृत तरूणाचे नाव आहे. विष्णूकांत याचे प्रेमसंबंध कर्नाटकातील नागमप्पली (ता. औराद, जि. बिदर) येथील विवाहित महिलेसोबत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेच्या नातेवाईकांनी २१ ऑक्टोबर रोजी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावले होते.

मात्र, प्रेमकहाणीचं रूपांतर क्रूर हत्याकांडात झालं. आरोपी गजानन आणि अशोक यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनी संगनमत करून विष्णूकांतचे हात - पाय बांधले. तरूणावर अमानुष अत्याचार करत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली. अत्याचाराच्या दरम्यान, त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बेदम मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत विष्णूकांतला उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wight Loss: जर तुम्हाला खरचं वजन कमी करायचं असेल, तर पुढील ३ महिने या ७ टिप्स फॉलो करा, व्हाल फॅट टू फिट

Stress Management: ऑफिसमधल्या वादामुळे झोप उडालीये? काळजी सोडा, 'ही' ट्रिक ठरेल फायद्याची

Pune : संशयित दहशतवादी हंगरगेकरची कुंडली समोर; पुण्यात १५ वर्ष कुठं काम करत होता? तपासात धक्कादायक माहिती उघड

Shocking : लग्न होत नव्हतं, डोक्यात शिरलं अंधश्रद्धेचं भूत; ४ मावशींनी केली १६ दिवसांच्या भाच्याची हत्या

Kaju Benefits: रोज सकाळी ५ काजू खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT