Accident News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident New: धक्कादायक! मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाने तरुणांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Ahmednagar Car Accident News: तसेच जखमी युवकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

Ahmednagar News: अहमदनगर येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करताना एका अज्ञात वाहनाने युवकांना चिरडलं आहे. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत राशीन रोडवर ही घटना घडलीये. वाहनाच्या धडके दोन युवकांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी युवकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील बेलवाडी येथील तरुण ओमप्रकाश धुमाळ आणि संकेत गदादे अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर केदार गदादे असं गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे. केदारवर कर्जतच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर बेनवडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत. आक्रमक ग्रामस्थांनी कर्जत राशीन रोडवर रास्ता रोको देखील केला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहन चालकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

भरतीमध्ये उतरण्यासाठी आणि आपले शरीर सुदृढ रहावे यासाठी गावातील काही तरुण मंडळी रोज या ठिकाणी व्यायामासाठी येत होते. नेहमीप्रमाणे आज देखील तरुणांचा एक ग्रूप येथे आला होता. मात्र आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. व्यायाम करत असतानाच एक अज्ञात वाहन त्याच्या दिशेने वेगात आले. दोघांनाही काही कळणार तोच या वाहनाने त्यांना चिरडले. दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Booking Rules: एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल, आजच करा हे काम, अन्यथा सिलेंडर मिळणार नाही

काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत पक्ष सोडला

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन सकपाळांना फोन; बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी विनंती

Summer Hair Care : शॅम्पू न वापरता चिकट केस होतील स्मूथ अन् सिल्की, फक्त ट्राय करा 'या' ५ ट्रिक्स

Crime: संतापजनक! बापाकडून पोटच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला मुलीला जन्म

SCROLL FOR NEXT