Lata Mangeshkar Saam TV
महाराष्ट्र

Lata Mangeshkar: 'काेल्हापूरातील 'त्या' प्रसंगाची आठवण लतादीदींच्या स्मरणात, आजही निराेप यायचा'

मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या

विजय पाटील

सांगली : सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि काेल्हापूर यांचं एक घट्टनातं आहे. चित्रपटांच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी जरी लता मंगेशकर यांची कर्मभूमी पूर्णवेळ मुंबई झाली असली तरी लहानपण आणि जयप्रभा स्टुडिओ व पन्हाळय़ातील बंगला यामुळे त्यांचे बहुतांशी वास्तव्य कोल्हापुरातच गेले. अनेक वेळा त्यांचा मुक्काम कोल्हापुरातच असायचा. काेल्हापूरात लतादीदी आल्या की त्या त्यांच्या आवडत्या ठिकाणी जरुर जायच्या. अंबाबाईचं (ambabai) दर्शन झालं की लतादीदी (lata mangeshkar) साडी, दागिने खरेदीसह खाण्याचे पदार्थावर ताव मारण्यासाठी कोल्हापुरातील बाजारपेठेत आवर्जुन फेरफटका मारत असतं. लता दीदींच्या काेल्हापूरातील अनेक आठवणी सांगतानच श्रीकांत डीग्रजकर भावविश झाले. (Lata Mangeshkar visits kolhapur)

डिग्रजकर म्हणाले कोल्हापुरात लतादीदींची खरेदीची हौस पूर्ण करणारी काही हमखास ठिकाणे होती. लतादीदींना काेल्हापूरातून साडी खरेदी करणे फार आवडत असे. त्या विशेषत: पांढराशुभ्र, दुधी, क्रिम अशा रंगांच्या साड्यांना पसंती देत. बहुधा त्यांच्या आवडीचे हे रंग असावेत. कोल्हापुरातील (kolhapur) महादवार रोडवरील पोरे ब्रदर्स यांच्या साडी दुकानात लतादीदींची हमखास साडीची खरेदी ठरलेली असयाची. त्याकाळात वर्षातून दोन साडय़ा त्या घ्यायच्या. पुढे संगीत क्षेत्रात गायिका म्हणून स्थिरावल्यानंतरही साडी खरेदीसाठी त्या कोल्हापुरातच येत असतं. पोरे ब्रदर्सनंतर स्टेशनरोडवरील इंगळे साडी हाऊस हेदेखील त्यांच्या साडी खरेदीचे केंद्र बनले. सुती, सिल्क, अंबरपॉलिस्टर यासोबत कॉटन च्ंदेरी, इंदोरी या प्रकारातील साडय़ा त्यांना आवडत.

चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दीदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंट या पेढीवर जात असत. भोजे म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या पत्नी बकुळा म्हणजे माई पेंढारकर यांचे भाचे. कोल्हापुरात जयप्रभा मुक्कामात लतादीदींसाठी माईंकडूनच जेवणाचा डबा यायचा. लतादीदींच्या त्या बकुळामावशी. मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या. अशा कित्येक पत्रांचा संग्रह आजही कोल्हापुरातील श्रीकांत डिग्रजकर यांच्याकडे आहे. बकुळामावशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी लतादीदींचा खास स्नेह असल्याने दीदी दागिन्यांसह चांदीच्या समया, आरतीचे तबक, निरंजने अशा पूजासाहित्याची खरेदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंटमधूनच करत. बांगडय़ा घालण्याचीही दीदींना खूप आवड होती.

अंबाबाई मंदिरातील महादवाराला लागूनच असलेल्या माहेर ब्ँगल्समधून बांगडय़ा भरल्याशिवाय दीदी कधीच कोल्हापूर सोडायच्या नाहीत. माहेर ब्ँगल्स या दुकानात साठच्या दशकातील दीदींचे बांगडय़ा भरतानाचे फोटो आजही त्या क्षणांच्या आठवणीची साक्ष देतात. तिथूनच पुढे महादवार चौकातील दुकानांच्या ओळीतलं दुसरंच दुकान म्हणजे दगडू बाळा भोसले यांनी बनवलेल्या पेढय़ांचे. अंबाबाईचे दर्शन झाले की लतादीदींना याच दुकानातील पेढे लागायचे.

आजही लतादीदी निराेप पाठवायच्या

लहानपणी जेव्हा पोटात भूकेची आग पेटायची आणि खायला काहीच नसायचे तेव्हा मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटीच्या शिंगोशी मार्केटच्या कोपर्‍यावर असलेल्या गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुर्‍यांनी मंगेशकर भावंडाची भूक भागवली आहे असेही डिग्रजकरांनी नमूद केले. त्या चुरमुर्‍यांना दीदी कधीच विसरल्या नाहीत. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून अजूनही हे पार्सल मागवून घ्यायच्या. आजही ही ठिकाणे कोल्हापुरात आहेत. त्यांच्या पुढच्या पिढया हे व्यवसाय सांभाळत आहेत. लतादीदी यांची कोल्हापुरातील ही खरेदीची आवडती ठिकाणे असल्याचा संबंधित व्यावसायिकांनीही खूप आनंद व अभिमान आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT