Indian Soldier Sunil Sawant, Satara saam tv
महाराष्ट्र

Satara : जवान सुनील सांवत यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Siddharth Latkar

Satara News : अमर रहे अमर रहे... जवान सुनील सावंत अमर रहे... या घाेषणांनी आज सातारा जिल्ह्यातील लिंब परिसर दणाणून गेला. पश्चिम बंगाल येथे बीएसएफ मध्ये कर्तव्यावर असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय 36 ) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या आजाराने दार्जिलिंग येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) लिंब गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Maharashtra News)

सुनील सावंत हे गांधीनगर ( गुजरात ) येथे लष्करात भरती झाले झाले. जोधपूर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बिकानेर ( राजस्थान), पश्चिम बंगाल, नक्षली ऑपरेशन (छत्तीसगड) येथे सेवा बजावली. सन 2021 पासून राधाबारी (पश्चिम बंगाल) येथे ते कार्यरत होते.

काही दिवसांपासून सावंत यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर दार्जिंलिंग येथे उपचार सुरु होते. सोमवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ही बातमी गावात वा-या सारखी पसरली. गावातील उमद्या युवकाचे निधन झाल्याचे समजताच ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात आली.

आज बुधवार जवान सुनील सावंत यांचे पार्थिव लिंब या त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. ग्रामस्थांनी सजविलेल्या ट्रॅक्टर मध्ये त्यांचे पार्थिव ठेवले. बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. मानवंदना देताच त्यांच्या पत्नीने भारत माता की जय अशा घोषणा दिली. यावेळी त्यांच्या आई, बहीण, वडील, भाऊ व नातेवाईकांनी टाहो फोडला.

जवान सावंत यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुनील यांच्या पार्थिवास वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला. यावेळी बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना देत रायफलच्या तीन फैरी झाडत सलामी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Marathi News Live Updates : सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाचवले १ कोटी रुपये

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेचं नेमकं गणित

SCROLL FOR NEXT