Jawan Umesh Misal,beed news saam tv
महाराष्ट्र

Beed News : ऊसताेड मजूर कुटुंबावर काेसळली कु-हाड; बीडच्या हुतात्मा उमेश मिसाळ यांना हजाराे युवकांचा साश्रु नयनांनी निराेप (पाहा व्हिडिओ)

Last Ritulas Of Jawan Umesh Misal : यावेळी युवा वर्ग गहिवरुन गेला हाेता.

विनोद जिरे

Beed News : वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घाेषणा देत आज (गुरुवार) जवान उमेश मिसाळ (Jawan Umesh Misal) यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी काेल्हेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील हजाराे ग्रामस्थांनी त्यांनी अखेरचा निराेप दिला. अवघ्या 22 व्या वर्षी उमेश मिसाळ हे देश सेवेत असताना हुतात्मा झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत माेठ्या संख्येने युवा वर्ग सहभागी झाला हाेता. (Maharashtra News)

बीडच्या केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश मिसाळ यांचा राजस्थान मधील सुरतगड येथे भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी मृत्यू झाला. उमेश मिसाळ हे दाेन वर्षांपूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. अवघ्या 22 व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने बीड जिल्ह्यात शाेककळा पसरली.

आज सकाळी एका सजवलेल्या डंपरमध्ये जवान उमेश मिसाळ यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी निघालेल्या अंत्ययात्रेत युवा वर्ग माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घाेषणांनी काेल्हेवाडी गाव दणाणून गेले.

खासदार प्रीतम मुंडे (MP Dr. Pritam Munde) यांच्यासह (beed) मान्यवरांनी जवान उमेश मिसाळ यांना आदरांजली वाहिली. जवान उमेश मिसाळ यांच्यावर भावपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार (Last Ritulas Of Jawan Umesh Misal) करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT