lasalgaon citizens demands sit inquiry of water pipeline worth rs 17 crore  Saam Digital
महाराष्ट्र

Lasalgaon Bandh Today : जलवाहिनी योजनेची एसआयटी चौकशी करा, लासलगावकरांचा मतदानावर बहिष्कार, Video

Nashik Lok Sabha Election : आजच्या बंद नंतर तरी नाशिकचे सुस्त प्रशासन जागे हाेईल का असा सवाल नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना उपस्थित केला. पाणीप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

नाशिकच्या लासलगाव मध्ये पाण्यासाठी आज (शनिवार) नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पुकारला आहे. दरम्यान 17 कोटी खर्चून देखील पाण्याच्या व्यवस्था हाेत नसेल तर या कामाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी लासलगावकरांनी केली असून येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. (Maharashtra News)

लासलगाव 16 गाव पाणी पुरवठा योजना वारंवार नादुरुस्त होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज लासलगावात कडकडीत बंद पाळला. सुस्त प्रशासन आता तरी जागे हाेईल का असा सवाल नागरिकांनी केला.

या योजनेच्या कामासाठी 17 कोटी खर्च झाले आहेत. तरी देखील पाईपलाईन नादुरुस्त होत असेल तर या कामाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केली. नागरिक म्हणाले प्रशासनाने ठाेस आश्वासन दिले नाही तर येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू. काेणत्याही निवडणुकीत मतदार मतदान करणार नाहीत असा इशारा देखील नागरिकांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT