- सागर निकवाडे
Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला जोडणाऱ्या चांदशैली घाटात (chandsaili ghat) दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी घाटातून प्रवास करताना याेग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे. (Maharashtra News)
नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला कमी अंतरात जोडणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घाटात दरडी काेसळत आहेत.
धडगाव ते तळोदा दरम्यान असलेल्या चांदशैली घाटात दरड (landslide) कोसळली. मोठं मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. जागोजागी रस्ता खचला असून सततच्या होणाऱ्या दरड कोसळणाच्या घटनेमुळे हा घाट धोकादायक बनला आहे.
या घाटातील धोकादायक दरड हटवण्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.