Raigad Breaking Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Breaking: आंबेनळी घाटात दरड कोसळली; पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प

Maharashtra Landslides Alert: आंबेनळी घाटा एवजी पर्यायी मार्गाचा वापर करा; रायगड पोलिसांचे अवाहन

Shivani Tichkule

Raigad Rain Update: मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांतच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहे. त्यातच आता आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार; पोलादपूरकडुन महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या आंबेनळी घाटात ही दरड कोसळली (Landslide) आहे. या दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरडी काढण्याचे काम सुरू आहे त्यामुळ दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

तसेच आंबेनळी घाटा एवजी पर्यायी मार्गाचा वापर करा असे अवाहन रायगड पोलिसांकडून (Police)करण्यात आले आहे. आंबेनळी घाटात दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे या घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मान्सूनचे (Monsson 2023) आगमन झाल्यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी “ऑरेंज अ‍ॅलर्ट” देण्यात आला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याबरोबर नाशिक, पुणे आणि सातारासह विदर्भात अमरावती, नागपूर येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया येथे काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊसही होऊ शकेल. या काळात विदर्भामध्ये मेघगर्जनेचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT