Nashik Lamborghini Car News
Nashik Lamborghini Car News तबरेज शेख
महाराष्ट्र

Nashik Video: कोट्यवधींची आलिशान लॅम्बोर्गिनी कार बनली 'दे धक्का' गाडी; कारमालकाची फजिती पाहून सगळेच चक्रावले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख, नाशिक

Nashik Lamborghini Car Video: हौसेला मोल नसते असे म्हणतात, आणि हौस पुरविण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसाही नसतो. मात्र कधी-कधी ही हौस फजितीचे कारणही होते. असाच एक प्रकार नाशिकच्या सिडकोतील (Cidco Nashik) उपेंद्र नगर येथे पाहायला मिळाला. सोमवारी दुपारी उपेंद्र नगरच्या रस्त्यावर एक आलिशान कार अवतरली. ही करोडो रुपये किंमतीची लॅम्बोर्गिनी (Lamborghini Car) कंपनीची ही कार बघण्यासाठी लोकांच्या नजरा नाही वळल्या तर नवलच. पण झाले भलतेच, करोड रुपये किंमतीची ही कार ढकलण्याची वेळ गाडी मालकाला आली आणि यावेळी कार बघण्यासाठी बघ्यांची गर्दीच गर्दी दिसून आली. (Nashik Latest News)

त्या महागड्या कारला बघणाऱ्यांची नजर लागली असावी किंवा सिडकोतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कारच्या बॅटरीचे लूज कॉन्टॅक्ट झाले असावेत. कारच्या बॅटरीचे लूज कॉन्टॅक्ट झाल्याने काही वेळातच ती कर बंद पडली. चालकाच्या अथक प्रयत्नांना बराचवेळ दाद न मिळाल्याने अखेर चार ते सहा जणांच्या मदतीने ही महागडी कार अक्षरशः दे धक्का करुन ढकलत नेण्याची वेळ कार मालकावर आली. (Nashik Viral News)

लॅम्बोर्गिनी कार म्हटल्यानंतर अनेकांचे डोळेही पानावले, मात्र एवढी करोडो रुपये किंमतीची कार कशी काय बंद पडू शकते हे बघण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. प्रत्यक्षात पाहिले असता कारची बॅटरी डाउन झाल्याचे समजले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही चालकाच्या मदतीला येत कार ढकलण्यास सुरुवात केली. उपेंद्रनगर ते पासून पाथर्डी फाट्यापर्यंत ही कार ढकलण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांनी कार बघण्यासाठी गर्दी देखील केली, मात्र काही नागरिकांनी या गंमतीशीर क्षणाचा पुरेपूर आनंद लुटला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal Nashik | कांदा प्रश्नावर भुजबळांचं मोदींना पत्र!

Today's Marathi News Live : सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांना घाबरण्यासाठी झाडल्या गोळ्या

Pakistan Privatisation: दिवाळखोरीमुळे पाकिस्तान हैराण! सरकारी कंपन्या काढल्या विक्रीला, आर्थिक संकटामुळे खासगीकरणाकडे वाटचाल

RR vs PBKS: राजस्थान संघाची संथ फलंदाजी; पंजाबसमोर १४५ धावांचे आव्हान

Benifits of Curd in Morning: सकाळी रिकाम्या पोटी दही खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT