- शुभम देशमुख
Bhandara News : तलावाचे पाणी शेतीला मिळत नसल्याने लाखनी तहसील (lakhani tehsil) कार्यालयासमोर शेतकरी (Farmers) बेमुदत उपोषणास बसले आहेत. तसेच ज्यांनी बेजबाबदारपणे तलाव फोडून पाणी घेतले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी (aandolan) केली आहे. (Maharashtra News)
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथील शेतकरी दशरथ रामटेके यांच्या मालकीच्या जमीन आहे. या गावा शेजारी तलाव आहे. या तलावाचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येतो. पण काही शेतकरी स्वत:च्या फायद्यासाठी रामटेके यांच्या शेती करीता पाणी देत नाही अशी त्यांची तक्रार आहे.
याची वारंवार तक्रारही रामटेके यांनी अधिकाऱ्यांकडे केली पण त्यांची व्यथा कोणीही एेकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले आहे. तर आता शेतीला पाणी मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) तर्फे लाखनी तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
2021 पासून 2023 पर्यंतची धान पिकाच्या झालेल्या नुकसानची भरपाई देण्यात यावी ज्यांनी बेजबाबदारपणे तलाव फोडून पाणी घेतले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.