Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'वरून लाडक्या बहिणी भिडल्या; प्रणिती बोलल्या, चुनावी जुमला, आदिती म्हणाल्या, अ‍ॅलर्जी!

Praniti Shinde Criticized Ladki Bahin Yojana: काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी प्रणिती शिंदेंना बेधडक प्रत्युत्तर दिले आहे.

Priya More

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या योजनेवरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत आहेत. अशामध्ये लाडकी बहीण योजनेवरून लाडक्या बहिणी भिडल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. याला महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी यांनी बेधडक प्रत्युत्तर दिले आहे.

प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेवर टीका करताना सांगितले की, 'लाडकी बहीण ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहिणीमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत. तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे तिला सावत्र करू नये.'

तर आदिती तटकरे यांनी प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'सुरूवाती पासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची अॅलर्जी आहे. एका बाजुला १५०० रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुस-या बाजूला ३००० रुपये देण्याचे वक्तव्य करतात. हे बोलणं दुटप्पीपणाचं आहे.' तसंच, 'पुढच्या काळात लाडकी बहीण योजना अशीच चालू राहणार आणि महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.', असं देखिल त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रणिती शिंदे यांनी बीडमधील गुन्हेगारीवरू धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, ' धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. ते या प्रकरणात आहे हे पूर्णपणे दिसून येत आहे. काँग्रेसचे सरकार असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले जायचे. त्यावेळी जरी ती लोक दोषी नसले तरीसुद्धा पब्लिक प्रेशरमुळे राजीनामे हे दिले जायचे. मात्र हे सरकार अतिशय निगरगठ्ठ आणि अहंकारी आहे. त्यामुळे हे लवकर हलतील असं दिसत नाहीये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT