Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेचा या महिलांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेचा या महिलांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Satish Daud

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. त्यानुसार, राज्यातील गरीब आणि होतकरू महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आतुर झाल्या असून अर्ज भरण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी करताना दिसून येत आहेत.

मात्र, या योजनेसाठी सरसकट महिला पात्र ठरणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्थी घालून देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला २१ ते ६५ वयोगटातील असाव्यात, अशी अट घालण्यात आली आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी प्राधान्य दिले जाणार आहेत. इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.

त्याचबरोबर सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना देखील योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. याशिवाय सरकारी योजनेतून आधीच मानधन घेणाऱ्या महिलाही देखील पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) लाभ जवळपास १ कोटी महिलांना मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१ जुलैपासून या योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक आणि दोन पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट!

Assembly Election: विधानसभेसाठी काँग्रेस लागली कामाला, 288 जागांवर चाचपणी सुरू; ठाकरे-पवारांचं टेंशन वाढणार?

Special Report: Team India: क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची उधळण!

Rasin Benefits: रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यावर काय होते ? जाणून घ्या

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित, विराट तुमचा निर्णय मागे घ्या; विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव होताच चाहत्यांना झाली 'रो-को'ची आठवण

SCROLL FOR NEXT