Ladki Bahin Yojna SaamTV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! डिसेंबरच्या हप्त्याची तारीख ठरली, मोठी अपडेट आली समोर

Mahayuti Government Schemes : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Saam Tv

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. या संपूर्ण कार्यकाळात महत्वाचा रोल प्ले करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे.

आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना जुलै महिन्यात सुरू केली. त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. दरमहा १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने त्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांना देण्यात आला होता. त्यामुळे एकूण ७५०० रुपये आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. दरम्यानच्या काळात ही योजना आचारसंहितेमुळे रखडली. मात्र आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असल्याने पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा पुढच्या दोन ते तीन दिवसांत जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

थकीत पैसे येण्यास सुरुवात..

दरम्यान, ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनही काही तांत्रिक कारणांमुळे अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT