Aditi Tatkare Saam tv
महाराष्ट्र

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलंय, तर...; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून देणार याची माहिती त्यांनी दिली आहे.

Priya More

सचिन बनसोडे, अहमदनगर

'लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही.' असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी कळसूआई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत हे मोठं विधान केलं.

आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले. 'लाडकी बहीण योजना चालूच ठेवणार आहोत. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणार आहोत. २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही २१०० देण्याचं वचन दिलंय. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की, 'लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून विरोधकांच्या नजरेत खुपतेय. योजना लागू झाल्यापासून विरोधकांनी कधी प्रशंसा केली नाही. विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य या योजनेवर काढताय.', अशा शब्दात आदिती तटकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी केली होती. सरकार स्थापन होऊन आणि अर्थसंकल्प सादर होऊन बरेच दिवस झाले तरी २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. लाडक्या बहिणी देखील २१०० रुपये हफ्ता मिळण्याची वाट पाहत आहेत. अशामध्ये विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT